बॉलीवूडचे कलाकार सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीला घेऊन चर्चेत असतात. अभिनेत्री मलायका अरोरा वयाच्या ४७ व्या वर्षी तिचा फिटनेस आणि अर्जुन कपूरच्या नात्याला घेऊन सतत चर्चेचा विषय ठरत असते. पण आता पुन्हा एकादा आई होण्याची इच्छा बोलून दाखवल्यानं मलायकाच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा डिवोर्स होऊन अनेक वर्ष झाले आहे. तसेच त्यांना १९ वर्षाचा मुलगा देखील आहे. असे असताना मलायकाने पुन्हा एकदा आई होण्याची इच्छा बोलून दाखवण्याच समोर आल आहे.
एका शो मध्ये मलायका अरोरा परीक्षक म्हणून पाहायला मिळत आहे. याच शोमध्ये तिने आई होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. खर तर मलायकाला मुलीची आवड आहे. तिला मुलगा असल्याने मुलींची हौस करायला मिळाल नाही, या शो तिने ही गोष्ट बोलून दाखवली.
‘छैया छैया’ आणि ‘मुन्नी बदनाम’ या गाण्यात आपल्या नृत्याने लोकांना घायाळ करणारी अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक कारणांमुळे बर्याचदा चर्चेत असलेली तर आपल्याला पाहायला मिळते. ।
0 Comments