"राज्यपाल आमदार नियुक्तीची शिफारस पत्र ड्रॉवरमध्ये ठेवून बसू शकत नाही"


 विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्त्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रखडवल्या आहेत. यासंबंधीच्या याचिकेवर न्या. काठावाला आणि न्या. तावडे यांच्या खंडपीठापुढं सुनावणी झाली. सामाजिक कार्यकर्ते रतनसोली लुथ यांनी ही याचिका दाखल केलीय. वकील गौरव श्रीवास्तव त्यांची बाजू मांडतायेत.

राज्य सरकारबरोबरच्या संघर्षामुळंच राज्यपालांनी १२ आमदारांच्या शिफारशीवर निर्णय घेतला नाही, असा युक्तिवाद श्रीवास्तव यांनी केला. इतर राज्यांमध्ये एका दिवसात निर्णय झाल्याची उदाहरणं त्यांनी न्यायालयाला दाखवून दिली. घटनादत्त अधिकारांचं वहन करण्यात राज्यपाल अपयशी ठरल्याचा आरोपही याचिकेत लावण्यात आलाय. 

६ नोव्हेंबर २०२० रोजी राज्य मंत्रिमंडळानं राज्यपालांकडं शिफारसीद्वारे १२ नावे पाठवलीयत. यावर राज्यपालांनी हो किंवा नाही असा निर्णय घ्यायला हवा, शिफारसपत्र ड्रॉवरमध्ये ठेवून ते बसू शकत नाही, असं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. राज्यपालांनी ते मंत्रिमंडळानं दिलेल्या नावांचा कधी विचार करणार तेही प्रतिज्ञापत्रात सांगावं. तसेच राज्यपालांनी काही तरी निर्णय घ्यायला पाहिजे, असं उच्च न्यायालयानं म्हटलंय.

Post a Comment

0 Comments