९ दिवसांचा जनता कर्फ्यु - उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश


उस्मानाबाद/प्रतिनिधी:

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी १५ मे सकाळी ७ ते २४मे सकाळी ७ वाजेपर्यंत असा ९ दिवसांचा जनता कर्फ्यु आदेश जारी केले आहेत. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आस्थापना बंद राहणार असून लोकांना विनाकारण बाहेर फिरण्यास बंदी असणार आहे.

१४ मे सकाळी ७ ते २४ मे सकाळी ७ या ९ दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर केला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असे आदेशीत केले आहे अत्यावश्यक सेवेत दवाखाने, लसीकरण, औषधी दुकाने, टॅक्सी ऑटोरिक्षा व सार्वजनिक बसेस वाहतूक, मालवाहतूक, पाणी पुरवठा सेवा, एटीएम,विद्युत व गॅस सिलेंडर पुरवठा या सुविधा पूर्णवेळ तर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पपं हे सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत व कृषी विषयक सेवा देणाऱ्या आस्थापना सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत सुरू राहतील. या ९ दिवसांच्या जनता कर्फ्यु काळात भाजीपाला , फळ विक्री , किराणा दुकान , बेकरी व इतर आस्थापना दुकाने बंद राहतील.

उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या दररोज ६०० ते ८०० रुग्ण सापडत असून १० ते १५ जणांचा मृत्यू होते आहे. यापूर्वी ८ मे ते १३ मे या काळात ६ दिवसांचा जनता कर्फ्यु लागू केला होता मात्र ईद निमित्त १२ मे ला एक दिवसाची जीवनावश्यक सेवांना सूट देण्यात आली होती.Post a Comment

0 Comments