नवऱ्याचा फोन तपासणं पडलं लाखो रुपयांना, नुकसान भरपाईसाठी कोर्टाने ठोठावला दंड


नवऱ्यावर पाळत ठेवणं एका महिलेला चांगलच महागात पडलं आहे. त्याचा फोन तपासल्यामुळे या महिलेला दंड भरावा लागला आहे. नवऱ्याच्या प्रायव्हसीचं उल्लंघन केल्याप्रकरणी दिवाणी कोर्टाने महिलेला दंड ठोठावला आहे. या महिलेने नवऱ्याच्या फोनमधील फोटो, काही रेकॉर्डिंग्स ट्रान्सफर करून घेतले होते. शिवाय त्याची प्रतीमा मलिन करण्यासाठी ते त्याच्या कुटुंबीयांना देखील पाठवले असल्याचे निष्पन्न झाल्याने कोर्टाने असा निकाल दिला आहे. 

रस अल खैमाह याठिकाणी ही घटना घडली असून या अरब महिलेला नवऱ्याचा फोन तपासण चांगलच महागात पडलं आहे.

Emarat Al Youm या अरब वृत्तापत्रामधील माहितीनुसार, या नवऱ्याने त्याच्या पत्नीकडे नुकसान भरपाईची मागणी करणारी याचिका कोर्टात दाखल केली होती. तिने त्याचे काही आक्षेपार्ह फोटो त्याच्या कुटुंबीयांना पाठवून त्याचा अपमान केल्याचा आरोप या पतीने केला आहे. या नवऱ्याने पत्नीवर असे आरोप केले आहेत की या केससाठी त्याला ऑफिसमधून सुट्टी घ्यावी लागली, परिणामी त्याचा पगार कापला गेला. शिवाय वकिलाच्या फीमध्ये देखील त्याचे बरेच पैसे गेले. या सर्वांचा परिणाम त्याच्या मानसिक स्वास्थ्यावर झाला आहे.

पत्नीच्या वकिलाने असा दावा केला आहे की संबंधित महिलेस तिचा नवरा शिवीगाळ करत असे. एवढंच नव्हे तर त्याने तिला घराबाहेर काढलं होत. त्याने तिला आणि त्यांच्या मुलीला कोणत्याही मदतीशिवाय वाऱ्यावर सोडलं होतं.

दरम्यान दिवाणी न्यायालयाने निकाल पतीच्या बाजूने दिला आहे. कोर्टाने नमूद केले आहे की पत्नीने हेरगिरी करून त्याच्या फोनमधील फोटो आणि रेकॉर्डिंग शेअर केले आहेत. परिणामी कम्यूनिकेशन्सच्या माध्यमातून त्याचा अपमान केला असल्याने  पत्नीने तिच्या पतीच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचे पुरावे सिद्ध केले आहे. पुरावे देखील हे सिद्ध करतात की पतीकडून खर्च आला आणि तो आर्थिक भरपाईस पात्र आहे. पुरावे हे देखील स्पष्ट करत आहेत की पतीने खर्च केला आहे आणि नुकसान भरपाईस पात्र आहे.

मात्र कोर्टाने पतीचा हा युक्तिवाद फेटाळला आहे की त्याने त्याचा पगार गमावला आहे कारण तो केसचा फॉलोअप घेत होता. पुराव्याआधारे पत्नीला Dh 5431 (जवळपास 1,07,585.02 रुपये) भरण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. पतीची नुकसान भरपाई करण्यासाठी हा दंड ठोठावण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments