मराठा आरक्षण लाभ घेतलेल्या काय होणार? जाणून घ्या, यापूर्वी मिळालेल्या नोकरी,शिक्षणाचे काय..??



नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. मात्र या निकालापूर्वी अनेकांना आरक्षणाद्वारे नोकऱ्या मिळाल्या आहेत अनेकांना शैक्षणिक प्रवेश मिळाले आहेत त्याबाबत नक्की काय होणार? असा संभ्रम असेल तर न्यायालयाने त्याबाबतही स्पष्टीकरण दिले आहे.

महाराष्ट्रात अशी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नव्हती की मराठा आरक्षण आवश्यक होते. तसेच आतापर्यंत मराठा आरक्षणावरून मिळालेल्या नोकऱ्या व प्रवेश कायम राहतील परंतु यापुढे आरक्षण दिलं जाणार नाही. एकूणच यापूर्वी आरक्षणाचा लाभ झालेल्यांचे शैक्षणिक प्रवेश आणि नोकऱ्या शाबूत राहणार आहेत. त्यामुळे ज्यांनी आरक्षणावरून नोकऱ्या आणि शिक्षण घेतले आहे त्यांना सध्यातरी चिंता करण्याची कोणतीही आवश्यकता नाही.

शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देणाऱ्या एसईबीसी कायद्याच्या वैधतेला एडवोकेट जयश्री पाटील- सदावर्ते यांनी आव्हान दिल्यावर राज्य शासनाने औरंगाबादचे विनोद नारायण पाटील हे या सुनावणीत प्रतिवादी होते पाच सदस्यीय घटनापीठ समोर याची सुनावणी झाली सर्वोच्च न्यायालयात १०२ वी घटना दुरुस्ती आणि ५० टक्के मर्यादा या दोन्ही प्रमुख मुद्द्यांवर राज्य सरकार व आरक्षण समर्थक खाजगी याचिकाकर्त्याने कडून प्रभावी युक्तिवाद झाला त्यानुसार सुनावणी झाली अखेर आरक्षण रद्द झालेला आहे. आज न्या. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाणे ऐतिहासिक निकाल सुनावेला आहे.

Post a Comment

0 Comments