हर्षाली मल्होत्रा एक भारतीय बालकलाकार आहे.
हर्षालीने बजरंगी भाईजानमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटातून मुन्नी घराघरात पोहोचली आहे.
या चित्रपटात मुन्नीच्या निरागसतेने रसिकांच्या मनाचा चांगलाच ठाव घेतला होता.
बजरंगी भाईजान या चित्रपटाआधी हर्षालीने काही मालिकांमध्ये काम केलं होते.
हर्षालीने चित्रपट आणि मालिकांसोबतच काही जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे.
बजरंगी भाईजान चित्रपटातील मुन्नीच्या भूमिकेमुळे हर्षालीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
तिला या सिनेमासाठी स्क्रीन अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता.
0 Comments