मानवी जीवनात लैंगिक संबध ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु त्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं ठरतं. ज्याप्रकारे सेक्स ही नैसर्गिक क्रिया आहे तसेच, स्त्रीयांसाठी मासिक पाळी देखील नैसर्गिक क्रिया आहे. परंतु मासिक पाळी दरम्यान लैंगिक संबधाबाबत अनेक गैरसमज आहेत.
याबाबत सविस्तर माहिती देण्यात प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला आश्चर्य वाटू शकतं, परंतु मासिक पाळीदरम्याम सेक्स करणं आरामदायी ठरू शकतं. यामुळे स्त्रीयांमधील क्रॅम्प्सपासून दिलासा मिळू शकतो. तसेच पीएपसीच्या लक्षणांमध्येही दिलासा मिळतो.
लैंगिक संबधांवेळी किंवा त्यानंतर हार्मोन, एंडोर्फिन आणि स्ट्रेस बस्टिंग केमिकल्स तयार होतात. हे केमिकल्स मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास कमी करू शकते.
काही लोकांना शंका असते की, पाळी दरम्यान लैंगिक संबध ठेवल्यास संसर्ग होऊ शकतो. आणि त्यामुळे प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. परंतु नक्की सत्य काय ? डॉक्टरांचे मत वाचा
१. मासिक पाळी दरम्यान लैंगिक संबंध ठवल्याने पोटाच्या त्रास कमी
काही महिलांना मासिक पाळीदरम्यान, पोटाचा त्रास सुरू होतो. रोजची जीवनशैली, व्यायाम न करणे, धुम्रपान, आणि मद्यसेवनामुळे हा त्रास होऊ शकतो. परंतु लैंगिक संबधांच्या परमोच्च आनंदामुळे हा त्रास कमी होण्यास मदत होते.
२. कंडोमचा वापर करा
मासिक पाळी दरम्यान लैंगिक संबध ठेवताना कंडोम महिलांना सुरक्षा प्रदान करतो. पाळीदरम्यान, इन्फेक्शनपासून बचावासाठी कंडोमचा वापर करणे योग्य ठरते.
३. मोकळेपणाने बोला
अनेक स्त्रीया पाळीदरम्यान आपल्या पार्टनरशी लैंगिक भावनेबद्दल बोलण्यास संकोच करतात. त्यामुळे आपल्या पार्टनरशी मोकळेपणाने बोला. आणि लैंगिक सुखाचा परमोच्च आनंद घ्या.
या दिवसांमध्ये मनावर आवर घालून लैंगिक संबध थांबवण्याची गरज नाही.
1 Comments
शक्यतो संबंध नकोच.
ReplyDelete