जेंव्हा बार्शी पोलीस निरीक्षक अनोळखी वेशात एकटेच मारतात फेरफटकाबार्शी/प्रतिनिधी:

रविवार बार्शी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची साप्ताहिक सुट्टी असते, सहसा सात दिवस चोवीस तास काम करणारे पोलीस अधिकारी सुटीचा दिवस कुटुंबात घालवतात आणि घालवलाही पाहिजे. मात्र आज रविवारी सुट्टी असताना बार्शीत नेमकं काय चाललंय, पोलीस आपले कर्त्याव्य व्यवस्थित बजावत आहेत का हे पाहण्यासाठी खुद्द बार्शी शहर पोलीस निरीक्षक संतोष गोरीगोसावी यांनी आपला नेहमीचा वेष सोडून कॉलेज बॉय सारख जीन्स पॅन्ट, टी शर्ट , टोपी आणि चेहरा ओळखू येणार नाही असा मास्क घालून दुचाकीवर बाहेर पडले. 

सहसा पोलिस निरीक्षक गिरीगोसावी हे हमेशा आपल्या चारचाकी गाडीत, सोबत पोलीस सहा. निरीक्षक, उपनिरीक्षक, तत्सम अधिकारी आणि कर्मचारी यांच्या गर्तेत बाहेर फिरत असतात. पण आज मात्र ते वेगळ्या वेशात बाहेर पडल्याने कोणालाही सहसा ओळखू आले नाहीत. मात्र त्यांनी आज पूर्ण शहर फिरत कोणती दुकाने चालू, कोण आतून माल विकतो, कोण चढ्या दराने माल विकतो, आणि नागरिक कसे विविध कारणे सांगून बाहेर पडतात याचा जणू अंदाजच घेतला. तर आज निरीक्षक साहेब यांचीच सुट्टी असल्याने काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जरा निवांतच असताना अचानक साहेब फिरतात असे कळल्यावर मात्र काहींची त्रेधातिरपीट उडालेली पाहायला मिळाली. आशा रीतीने गिरीगोसावी यांनी फेरफटका मारून नक्कीच काही निरीक्षणे नोंदवली असणार. आता येणारे काही दिवसात काही नागरिक, दुकाने, विविध आस्थापना किंवा पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाई झाली तर वावग वाटणार नाही, हे मात्र नक्की, कारण “टप्प्यात आला की कार्यक्रम होतोच” . या उक्तीवर गिरीगोसावी यांचा विश्वास आहे.

Post a Comment

0 Comments