जगातील सर्वात पहिली कोरोना लस घेणाऱ्यांमधील विल्यम शेक्सपिअर नावाच्या ८१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मात्र शेक्सपिअर यांचा मृत्यू करोनामुळे झाला नसून आधीपासून असणाऱ्या आजारामुळे झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
८ डिसेंबर रोजी त्यांना फायझर-बायोएनटेकच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी हॉस्पीटल कॉनव्हेंट्रीमध्ये मार्गारेट केनान या ९० वर्षीय आजींबरोबरच शेक्सपिअर यांनाही लसीचा डोस देण्यात आला होता. क्लिनिकल ट्रायलदरम्यान या दोघांनाही लसीचे डोस देण्यात आले होते.
जगातील सर्वोत्तम नाटककार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विल्यम शेक्सपिअरच्या नावाशी साधर्म्य असणारं नाव असल्याने त्यांची जगभर चर्चा झाली होती. ज्या युनिव्हर्सिटी हॉस्पीटल कॉनव्हेंट्रीमध्ये शेक्सपिअर यांनी लस घेतली त्याच रुग्णालयामध्ये त्यांचा मृत्यू झाला. शेक्सपिअर हे रोल्स रॉयस कंपनीचे माजी कर्मचारी होते.
0 Comments