मोदींच्या अश्रूंना कंगना दिला पदर, अन् ट्रोलर्सची घेतली जोरदार खबर


वाराणसीतील डॉक्टरांसोबत संवाद परिस्थितीचा आढावा घेत असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले असल्याचे अख्ख्या देशातील जनतेने पाहिले होते. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राज्यातील यंत्रणांसोबत बैठका घेताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचा उल्लेख करीत मोदींना गहिवरून आले होते. 

 बैठकीत भावुक होणे हा ठरवून केलेला कार्यक्रम होता, अशी सणसणीत टीका विरोधकांनी केली. सोशल मीडियावरही त्यांच्या या भावुकपणाची जोरदार खिल्ली उडवली गेली. आता यावर भक्त कंगना राणावतने प्रतिक्रिया दिली आहे. सोबत मोदींच्या भावनाही समजून घेण्याबाबत वक्तव्य केले आहे.

अभिनेत्री व भाजप पक्षाशी कट्टर असलेली कंगना रनौत हिने इंस्टाग्राम स्टोरीवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. ‘अश्रू खरे होते वा खोटे… तुम्ही टिअर डिटेक्टर टेस्टमध्ये गुंतून राहणार आहात की दुस-याचे दु:ख बघून तळमळणा-या व्यक्तिच्या भावना स्वीकारणार आहात. वेदना असहनीय होतात तेव्हा त्या व्यक्त कराव्याच लागतात. हे दु:ख वाटावेच लागते. मी तुमचे अश्रू स्वीकारतेय… पंतप्रधान मोदीजी मी तुम्हाला तुमचे दु:ख शेअर करू देईन… प्रिय भारतीयांनो प्रत्येक आशीर्वाद समस्या समजू नका. स्वत:चे अ‍ॅटिट्यूट आणि विचार स्वत: ठरवा, असे कंगनाने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments