सासूसोबत अनैतिक संबंध ; जावयाने केला गळा आवळून खून....


पुण्यात जावयाने सासूचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. दोघांमध्ये अनेक महिन्यापासून अनैतिक संबंध होते.  अनारकली महम्मद तेरणे (वय ४५) असे मयत सासूचे नाव असून आसिफ दस्तगीर आत्तार (वय २६) आरोपी जावईचे नाव आहे. ते दोघे मूळचे कर्नाटक येथील होते. 


वर्षभरापासून ते बिबवेवाडी येथे एकत्र राहण्यास होते. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अनारकली महम्मद तेरणे या महिलेच्या मुली सोबत आरोपी आसिफ दस्तगीर आत्तार याचे लग्न झाले होते. पण लग्नानंतर काही दिवसांनी जावई आणि सासू यांच्यात प्रेम संबध असल्याचे अनारकली यांच्या पतीला आणि मुलीला समजले. 
त्यानंतर आरोपीची पत्नी त्याला सोडून निघून गेली.
 
यामुळे मयत सासू आणि जावई कर्नाटकमधून पुण्यात राहण्यास वर्षभरापूर्वी आले होते. पुण्यात आल्यावर आरोपी आसिफ हा मिळेल ते काम करून घर चालवत होता. आसिफ हा अनारकलीकडे जेवण व्यवस्थित करत नसल्याची तक्रार करत असे. त्यावर घरात खर्चासाठी पुरेसे देत नसल्याची तक्रार आसिफची सासू करत असे. 
दोघांमध्ये जोरदार भांडण झाल्यानंतर आसिफने ओढणीच्या सहाय्याने सासूचा गळा आवळून खून केला.
 या घटनेनंतर पोलिसांनी काही तासांतच आसिफला अटक केली आहे. बिबवेवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments