माळशिरस तालुक्यात वाळू तस्करी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, ४८ लाखाचा मुद्देमाल जप्तपंढरपूर/प्रतिनिधी:

माळशिरस तालुक्यातील निरा नदी पात्रात बेकायदेशीरीत्या वाळू उपसा करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अकलूज पोलिस ठाण्यामध्ये पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी दिली आहे.

अकलूज पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नीरा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मुरलीधर शिंदे, अमोल शिरसागर, हर्षवर्धन शिरसागर, तुकाराम शिरसागर (रा. गिरवली ता. इंदापूर) देविदास बाळू जाधव (रा. तांबवे ता. माळशिरस) यांना रंगेहात पकडण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुगावकर करत आहे


निरा नदी पत्रातून ४८ लाखाचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माळशिरस तालुक्यातील संगम जांभुळबेट येथील नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती अरुण सुगावकर मिळाली. यानंतर पथक तयार करून खाजगी वाहनातून संगम जांभूळ बेट येथे नदीपात्रात गेले असता. सदर नदी पात्रातून अवैधरित्या जेसीपी मशीन च्या सहाय्याने विनापरवाना बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याचे दिसून आले. त्याचवेळी त्यांनी पाच जणांना रंगेहाथ पकडले त्यावेळी त्यांच्याकडून जेसीपी मशीन महिंद्रा कंपनीचे दोन ट्रॅक्टर व एक ट्रॉली, १ ब्रास वाळू अशाप्रकारे ४८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अकलूज पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला .

Post a Comment

0 Comments