....अन् कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती १०दिवसांनी परतली घरी; परिसरात खळबळ



जयपुर :

अंत्यसंस्कार झालेली व्यक्ती तब्बल १० दिवसानंतर घरी परतल्याने एकच खळबळ माजली. सदरील घटना राजस्थानच्या राजसमंद येथे घडली आहे. राजस्थानमधील आरके रूग्णालयात उपचार घेत असलेल्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह ओमकारलाल गाडोलिया यांचा असल्याचं सांगत रुग्णालयाने तो कुटुंबियांना सुपूर्द केला व कुटुंबियांनीही त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. ज्या रुग्णालयात ओमकारलाल वर उपचार सुरू होते त्याच रुग्णालयात काही लोकांनी गोवर्धन प्रजापत यांना दाखल केलं, तसेच गोवर्धन प्रजापत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी गोवर्धन प्रजापत यांचा मृतदेह बेवारस पडला आहे, असं स्पष्ट केलं. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी विविध ठिकाणावरून लोक रुग्णालयात आले पण ओमकारलाल यांच्या कुटुंबीयांनी जन्म खुणेच्या आधारावर हा मृतदेह ओमकारलाल यांचाच असल्याचं सांगितलं व त्यांनी शवविच्छेदन न करता मृतदेह देण्याची विनंती केली. काही दिवस रूग्णालयाच्या शवागरात मृतदेह पडून असल्याने चेहऱ्याने ओळख पटवणे शक्य नव्हते.

रुग्णालयाने ओमकारलाल गाडोलिया यांच्या नावाने डीएनए चाचणी न करता आणि शवविच्छेदनही न करता मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला. पण बेवारस मृतदेह असेल तर त्याची डीएनए चाचणी करणं नियमाने बंधनकारक आहे, तरीही मृतदेह रुग्णालयाने तसाच सुपूर्द केला. या प्रकरणात कुटुंबियांनी १५ मे रोजी या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे १० दिवसांनी रुग्णालयात उपचार घेत असलेला आणि दारूचे व्यसन असलेला ओमकारलाल गाडोलिया आपल्या घरी परतला. 

Post a Comment

0 Comments