श्री विठ्ठल मंदिर समिती कडून कोविड सेंटर व गरजू नागरिकांना हापूस आंब्यांची वाटप


पंढरपूर/प्रतिनिधी:

अक्षय तृतीय निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभार्‍यात मनमोहक हापूस आंब्याची आरास तयार करण्यात आली होती. ही आरास साडेसहा हजार हापूस आंब्यासह विविध फळांचा समावेश होता. विठ्ठल मंदिर समितीकडून सजावट केले आंबे प्रसाद म्हणून कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल तसेच गरजू नागरिकांना वाटप करण्यात आले.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक आंब्यांची आरास

वैष्णवांच्या आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास ६५०० हापुस आंब्यानी विविध फळांची मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पपई, डाळिंब, सफरचंद, मोसंबी, संत्री, कलिंगड, खरबूज, आननस यांसारख्या साडेसहा हजार फळांचा वापर करण्यात आला. या यासाठी सुमारे अडीच लाख रुपये खर्च आला आहे..अमराई आरास पुणे येथील विठ्ठल भक्त विनायक शेठ काची यांनी केली आहे.

मंदिर समितीकडून आंब्यांचे कोविड सेंटर मध्ये वाटप.

राज्य जिल्ह्यांमध्ये कोरोनाने हाहाकार उडवला आहे त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. मात्र मंदिर समिती कडून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात आंब्यांची आरास करण्यात आली होती. सजावटीमधील हापूस आंबे पंढरपूर येथील कोविड केअर सेंटर, हॉस्पिटल मधील रुग्णांना तसेच रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना प्रसाद स्वरूपात वाटप करण्यात आले. त्याचवेळी पंढरपूर येथील पालवी संस्था, बेघर निवास, पत्राशेड, घाट परिसर, बस स्टॅन्ड, कामगार वर्ग, झोपडपट्टी येथील लहान मुले व कुष्ठरोगी वसाहत इत्यादी ठिकाणी आंब्याच्या सजावटीचे प्रसाद स्वरूपात वाटण्यात आले..

मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांकडून वाटप
पंढरपूर येथील कोट सेंटर हॉस्पिटल तसेच विविध संस्था व झोपडपट्टी परिसरामध्ये कोरुना रुग्ण व लहान मुलांना आंब्यांचे तसेच विविध फळांचे वाटप करण्यात आले यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कर्मचारी यांनी स्वतः आंब्याचे वाटप केले यावेळी त्यांनी पूर्ण नियमांचे पूर्णपणे पालन करत आंब्याची वाटप केले असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली आहे..

Post a Comment

0 Comments