राज्यात लागू असलेली कडक संचारबंदी ३१ मेपर्यंत कायम राहणार


राज्यात लागू असलेली कडक संचारबंदी ३१ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अजूनही काही जिल्ह्यांमधे कोरोनाची स्थिती गंभीर असल्यामुळे हा निर्णय घेतला आहे, असं ते म्हणाले.

राज्यात सध्या लशींचा साठा मर्यादित आहे, त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातल्या सर्व लाभार्थ्यांचं लसीकरण काही दिवसांसाठी थांबवलं आहे आणि हा लशींचा साठा ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांच्या दुसऱ्या मात्रेसाठी वापरला जाणार आहे. ऑक्सिजनच्या स्वयंतेपूर्णतेकडे राज्याची वाटचाल सुरु आहे, असेही त्यांनी सांगितलं. 

Post a Comment

0 Comments