अभिनेत्री रश्मिका मंदाना सोशल मीडिया यूजर्स आणि तिच्या चाहत्यांमध्ये 'नॅशनल क्रश' म्हणूनच ओळखली जाते. या दरम्यान, रश्मिकाने आपला आवडता क्रिकेटपटू कोण आहे, याची माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी रश्मिकाने आयपीएलमधील संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा आपला आवडता संघ असल्याचे सांगितले होते. यामुळे बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली हा रश्मिकाचा आवडता खेळाडू असेल, असा कयास चाहत्यांचा होता. विराटसोबत रोहित शर्माचे नाव देखील चर्चेत होते. परंतु, तिला ना विराट आवडतो ना रोहित.
रश्मिकाला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आवडतो. तिने इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये याची कबुली दिली. तिने म्हटलं की, धोनीची फलंदाजी, नेतृत्व आणि यष्टीरक्षक शानदार आहे. तो एक मास्टर क्लास खेळाडू आहे. धोनी माझा हिरो आहे.
0 Comments