....म्हणून परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले - अनिल देशमुख


  परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर आरोप पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं. त्यामळे अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होेता. आता अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे.

 मुंबईचे पोलीस आयुक्त असताना अंबानींच्या घराबाहेर जिलेटिन सापडणं किंवा मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही घटनांच्या बाबतीत परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची भूमिका अत्यंत संशयास्पद होती.परमबीर सिंह यांनी अतिशय गंभीर चुका केल्या. त्या माफ करण्यालायक नव्हत्या. म्हणून मी गृहमंत्री असताना परमबीरसिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून बदली केली, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची संशयास्पद भूमिका होती. त्यांना पदावरून हटवल्यानंतर त्या रागातून त्यांनी माझ्यावर आरोप केले असल्याचं अनिल देशमुख म्हणाले. त्यांना पदावरून हटवल्यानंतर त्या रागातून त्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. त्यांना आरोप करायचे होते तर पदावर असताना त्यांनी आरोप करायला हवे होते, असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सीबीआयने वाझेंना पुन्हा सेवेत घेण्याचा आणि त्यांना महत्त्वाची प्रकरणे हाताळण्यास देण्याचा मुद्दा मर्यादेबाहेर जाऊन एफआयआरमध्ये समाविष्ट केला आहे. न्यायालयानेही मर्यादित तपास करायला सांगितला असतानाही सीबीआयने मर्यादेपलीकडे जाऊन तपास केल्याचा मुद्दा सरकारने याचिकेत उपस्थित केला आहे.


 

Post a Comment

0 Comments