रंगी रंगला श्रीरंग : मोहिनी भगवंत एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी गाभाऱ्या व मंदिरास आकर्षक फुलांची आरास



पंढरपूर/प्रतिनिधी:

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आज रविवारी मोहिनी भागवत एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात आकर्षक व नयनरम्य रंगीबिरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे. यामुळे मंदिराचा फुलामुळे गाभारा मनमोहक दिसत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पांढराशुभ्र अशा मोगरा फुलांचा अधिक वापर करून सजावट करण्यात आली. कोरोना पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर वारकरी भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात तीनशे टन फुलांची आरास

भागवत एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात व मंदिरास मनमोहक आरास श्री विठ्ठल भक्त 
नानासाहेब दिनकर पाचुंदकर पाटील यांनी मोफत सेवा केली आहे.  मंदिरातील श्रीं चा गाभारा व चौखांबी फुलांच्या रंगीसंगीत सजला आहे. यामध्ये झेंडू, मोगरा, अष्टर, गुलाब फुलांचा वापर करण्यात आला तर तीनशे टन फुल वापरून आकर्षक अशी फुलांची आरास तयार करण्यात आली. या सजावटीला सुमारे ८० हजार रुपये खर्च आल्याचे सांगण्यात आले आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुनेसुने

सद्या कोरोनामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पूदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या फुलांची आरास व श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या संकेत स्थळ व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून घेता येत आहे.

Post a Comment

0 Comments