लज्जापद! रुग्णवाहिका हलताना दिसली ; रुग्णवाहिकेत अश्लील चाळे केल्याप्रकरणी चौघांना अटक


वाराणसी : रुग्णवाहिकेत अश्लील चाळे केल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील लखनऊच्या सुजाबादी चौकी परिसरातील आहे. रस्त्याच्या कडेला उभी असलेली रुग्णवाहिका हलत असल्याचे काही जणांना दिसले. त्यांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांना रुग्णवाहिकेत एक महिला आणि तीन पुरुष अश्लील चाळे करताना आढळून आले. चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वाराणसीच्या रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील सुजाबाद चौकी परिसरात हा लज्जास्पद प्रकार सुरू होता. येथे एका रुग्णवाहिकेमध्ये एक तरुणी आणि तीन तरूण अश्लील चाळे करत होते. तेथील नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी जाऊन येथून या चौघांनाही अटक केली असून रुग्णवाहिकाही ताब्यात घेतली आहे.

पोलिसांनी आल्यानंतर बंद रुग्णवाहिकेतून तीन तरुण आणि एका तरुणीला बाहेर काढले. या चौघांसह रुग्णवाहिकाही ताब्यात घेऊन रामनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आली. तीन तरुण आणि या तरुणीविरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांनाही सध्या जेलची हवा खावी लागत आहे.

सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याबद्दल या चौघांनाही अटक करण्यात आली आहे आणि संबंधित रुग्णवाहिका जप्त करण्यात आली आहे, असे एसीपी प्रवीण सिंह यांनी सांगितले. गंगा सेवा धाम नावाच्या एका रुग्णालयाची ही रुग्णवाहिका आहे. ती सध्या एका तरुणाला भाड्यानं चालवण्यासाठी दिली आहे, असेही पोलिसांच्याकडून सांगण्यात आले आहे. सध्या रुग्णवाहिका सर्वत्र धावतानाच दिसून येत असताना ही एक रुग्णवाहिका बराच वेळ एकाच ठिकाणी आणि तेही निर्मनुष्य ठिकाणी उभी होती तसेच ती हलत असल्यानं परिसरातील लोकांना शंका आली आणि नंतर त्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितले.
 
← 

Post a Comment

0 Comments