“मोदी २०२२ राष्ट्रपती बनतील, तेव्हा राष्ट्रपती राजवट लावून ते स्वत: सरकार चालवतील” दिल्लीच्या सीमाभागावर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे किसान युनियनचे नेता राकेश टीकेत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती बनतील, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान शेतकरी नेते राकेश टीकेत यांनी सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे आणि राष्ट्रपती राजवट लागू व्हायला पाहिजे, अशी मागणी केली आहे. त्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०२२ मध्ये राष्ट्रपती बनुन, संपूर्ण भारतात राष्ट्रपती राजवट लागू करून देश चालवतील, अशा प्रकारची टीका त्यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुका २०२४ ला होणार असल्या तरी राष्ट्रपतींची निवडणुक  २०२२ मध्ये होणार आहे. त्यामुळे मोदीच पुढचे राष्ट्रपती होतील आणि राष्ट्रपती राजवट लागू करून सरकार चालवतील, अशाप्रकारची खोचक टीका राकेश टिकैत यांनी चर्चेदरम्यान केली आहे. त्याबरोबरच लसीकरणावरूनही त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले.

Post a Comment

0 Comments