नाशिक:
"माझी भूमिका ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आण जनतेची भूमिका एकच आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत जबाबदारी झटकत आहेत. पण, मराठा समाजाला याच्याशी काही घेणं-देणं नाही. टीमटीम करणारे माझ्या भूमिकेवर बोट ठेवत आहेत. मी छत्रपतींचा वंशज आहे, मला कोणी शिकविण्याची गरज नाही", अशा शब्दांत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी टिकाकारांची समाचार घेतला.
दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर संभाजीराजे छत्रपती आहेत. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले, त्यावर त्यांची भूमिक काय आहे, याकडे सर्वांच लक्ष होतं. त्यावरच त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत घेऊन आपली भूमिका मांडली. संभाजीराजे पुढे म्हणाले की, "मी शांत आहे, ही महाराजांची शिकवण आहे. मी आक्रमक होणार याआधी मार्ग काय काढणार, हे सांगा. सध्या मी महाराष्ट्र पिंजून काढतो आहे. अभ्यासू लोकांशी चर्चा करतो आहे. येत्या २७ मेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षांना भेटणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. सगळ्या आमदार आणि खासदारांना माझी वाॅर्निंग आहे, मराठी समाजाला विनंती आहे की, २७ मे पर्यंत शांत रहा", असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
"जे हातात आहे ते लगेच करा, हे मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे. नोकरी देण्यात काय अडचण आहे. सारथीला दिलेलं शाहू महाराजांचं नाव काढून टाका. आताची सरकारची भूमिका अयोग्य आहे. आंदोलन कसं करायचं मला कोणी शिकवायची गरज नाही. मला आक्रमक व्हायला २ मिनिटं लागतील. १०२ व्या घटनादुरुस्तीवर २७ मे रोजी बोलणार आहे", असंही संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांना सांगितले.
0 Comments