हि घटना उत्तर प्रदेशातील मेरठ येथील जिलानी कॉलनीमध्ये घडली आहे. आपल्या बायकोसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका नराधमाने आपल्या मित्राची गोळी झाडून हत्या केली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दोन वर्षांपूर्वी सरफराज आणि मुस्तफा हे दोघेजण पावरलूम फॅक्टरीत एकत्र काम करत होते. त्यामुळे त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. यादरम्यान सरफराजला मुस्तफाचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आला. यामुळे त्या दोघांमध्ये मोठा वाद झाला. यामुळे मुस्तफा राहते घर सोडून दुसरीकडे राहायला गेला आणि त्याचे घर भाड्याने दिले. यानंतर मंगळवारी रात्री उशिरा मुस्तफा जेव्हा घरभाडे घेण्यासाठी गेला तेव्हा सरफराज आणि त्याच्या साथीदारांनी त्याला पकडले आणि त्याला जबदस्त मारहाण केली. मात्र तरीसुद्धा तो जिवंत असल्यामुळे सरफराजने त्याच्या छातीवर गोळी झाडली यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत आरोप तेथून फरार झाले होते. या अगोदरदेखील सरफराजने मुस्तफाला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मुस्तफाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पण पोलिसांनी याची कोणतीही दखल घेतली नव्हती. यामुळे आरोपीची अजून हिंमत वाढली आणि त्याने त्याची हत्या केली. या प्रकरणाचा अधिक तपास एसपी विनीट भटनागर करत आहेत.
0 Comments