बार्शीत सहायक आयुक्तावर फसवणुकीचा गुन्हा दाखल



बार्शी/प्रतिनिधी:

मुलीच्या विवाहासाठी पैशाची अत्यंत निकड असल्याने बार्शी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने भविष्य निर्वाह निधीतील साडेसहा लाख रुपयांची रक्कम वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाचा बनावट दस्तऐवज तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

 डॉ. नाना अर्जुन सोनवणे (जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. ही घटना २६ एप्रिल रोजी घडली. प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त पुणे कार्यालयाने माहिती दिली की, डॉ. तानाजी खांडेकर यांनी ६ लाख ५० हजार रुपयांचे देयक उपकोषागार अधिकारी, बार्शी येथे बनावट मंजुरी आदेशाने सादर केलेले आहे. उपकोषागार अधिकारी यांना सूचित करून देयक रोखण्याची कार्यवाही करावी, त्या वेळी मेलद्वारे तत्काळ प्रक्रिया करून २७ एप्रिल २०२१ रोजी देयक ताब्यात घेतले.

 पाठपुरावा केल्यानंतर आदेश प्राप्त झाला, परंतु तो चुकीचा असल्याने पुन्हा १६ एप्रिल रोजी प्रस्ताव सादर केला. कोव्हिड कारणाने प्रस्ताव पुणे येथे घेऊन जाणे शक्‍य नसल्याने वरिष्ठ कार्यालयाचे बनावट मंजुरी आदेशाचे पत्र २२ एप्रिल २०२१ रोजीचा जावक क्रमांक, सही करून २६ एप्रिल २०२१ रोजी मंजुरीसाठी उपकोषागार अधिकारी, बार्शी येथे सादर केले होते.

Post a Comment

0 Comments