जालना: माझ्या मृत्यूला कोणालाच दोषी धरू नका, असे भावनात्मक पत्र वडिलांच्या नावे लिहून २४ वर्षीय डॉ. प्रांजल ज्ञानेश्वर कोल्हे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
डॉ.प्रांजल ज्ञानेश्वर कोल्हे यांनी रविवार दुपारी २ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. पाच महिन्यांपूर्वीच त्यांचा शहरातील जनाई हॉस्पिटलचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर कोल्हे यांच्याशी विवाह झाला होता विवाह झाला होता. डॉक्टर असलेल्या नवविवाहितेने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र त्यांनी वडिलांच्या नावे लिहिलेली चिठ्ठी पोलीसांना मिळाली आहे. अतिशय भावनिक पत्रात डॉ. प्रांजल यांनी वडिलांना उद्देशून लिहिले आहे, 'पप्पा मला माफ करा, मी आज आत्महत्या करीत आहे. त्यामध्ये कोणाला दोषी धरू नये.' घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पाहणी करून आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.
0 Comments