"बार्शी नगरपरिषदेस ऑक्सीजन प्लांट करीता तात्काळ दोन कोटी रुपयांच्या निधीचे आदेश"


बार्शी/प्रतिनिधी:

 बार्शी येथे आमदार तानाजी सावंत यांच्या भगवंत इन्स्टिट्यूट येथील भव्य कोविड सेंटर च्या उद्घाटन कार्यक्रमास विकास मंत्री एकनाथजी शिंदे उपस्थित होते.

त्यांच्याकडे आमदार तानाजी सावंत, आमदार राजेंद्र राऊत , नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी यांनी बार्शी नगरपरिषदेस ऑक्सीजन प्लांट उभारणी करीता निधीची मागणी केली होती, तात्काळ दोन कोटी रुपयांच्या निधी मंजुरीची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी केली व या संदर्भातील आदेश मंत्रालयाला दिले या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करत मंत्रालयाने आदेश काढून रक्कम संबधित खात्याकडे वर्ग केली आहे. हा निधी राज्यातील नगरपरिषदांना , वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते.

सदर योजनेचे सुधारीत निकष व मार्गदर्शक तत्त्वे संदर्भाधीन शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेले आहेत .शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यतेचे आधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.शासन निर्णयान्वये सन २०२०-२१ करिता रक्कम रु .१०५७.१४ कोटी रक्कम नगरपरिषद प्रशासन संचालनालय,मुंबई यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.

 राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी नगरपालिकांना “ नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान ” या योजनेंतर्गत निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या नुसार प्रादुर्भावर उपाययोजना करण्यासाठी बार्शी नगरपरिषद,जि.सोलापूर यांस “ नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान ” या योजनेअंतर्गत रक्कम रु .२,००,००,००० / – ( अक्षरी रक्कम रुपये दोन कोटी मात्र ) इतका निधी वितरीत करण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात आली आहे.

कोव्हीड -१९ च्या प्रादुर्भावावर त्वरीत उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने एक विशेष बाब म्हणून सदर निधीबाबत प्रशासकीय मान्यतेचे आधिकार संबंधित नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांना राहतील
व यामध्ये कुठलीही वित्तीय अनियमितता असूनये असे या शासन निर्णयात नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments