हृदयद्रावक! आई शेत नावावर करून देत नाही म्हणून आईलाच जिवंत जाळण्याचा प्रयत्न


जळगांव: शेत जमीन नावावर करून देत नाही म्हणून एका कुपुत्राने स्वत:च्याच आईला जिवंत पेटून दिल्याची घटना जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील मोरगांव येथे घडली आहे.यात आई गंभीर भाजली असल्याचे वृत्त आहे.

रावेर तालुक्यातील मोरगांव खुर्द येथून शेत जमीन विकुन मुलाच्या नावावर करावी तसेच सजंय गांधी निराधार योजनेचे पैसे त्याला द्यावे म्हणून स्वता:च्या मुलाने आपल्या ७० वर्षीय आई जिवंत जाळण्याचा प्रर्यत्न केला व स्वत:चे घरदेखिल पेटवुन दिले आहे. सुगंधा पाटील ( वय ७० ) असे या गंभीर भाजलेल्या महिलेचे नाव असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments