"विवाहित प्रेयसीवर संशय घेऊन मध्यरात्री तिच्या घरी जाणं प्रियकराच्या जीवावर बेतलं"



पुण्यातील पिंपरी येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. विवाहीत महिलेसोबत प्रेमसंबंधात असणाऱ्या प्रियकराला आपल्या प्रेयसिवर संशय आल्याकारणाने त्याने चक्क मध्यरात्री थेट तिचं घर गाठलं. मात्र तिच्यावर संशय घेणं त्याला जिवावर बेतलं. मध्यरात्री घरी गेल्यावर दोघांमध्ये वाद पेटला. हा वाद घरात ऐकू गेल्यानंतर धक्कादायक प्रकार घडला.

विवाहीत महिलेने याबाबतची तक्रार नोंदवली आहे. तक्रारीमध्ये संबंधित महिलेने तिच्या भावासोबत आणखीन १७ जणांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. संबंधित महिला तिच्या पती आणि मुलांसोबत झोपली असताना अचानक कोणीतरी मागच्या दरवाजावर दगड फेकत असल्याचं महिलेला समजलं म्हणून ती झोपेतून उठली. त्यानंतर कोणीतरी तिच्या घराचं दार वाजवल्यामुळे तिने दार उघडल्यावर तिचा प्रियकर मध्यरात्री तिथं दिसला.

 त्यानंतर संबंधित प्रियकराला टेरेसवर नेऊन त्याला मारहाण करुन टेरेसवरुन खाली फेकलं. यामध्ये प्रियकराचा मृत्यू झाला आहे. अक्षय अनिल काशीद असं खुन झालेल्या तरुणाचं नाव असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments