गर्लफ्रेंड लग्न करण्यासाठी देत होती त्रास, विवाहित प्रियकरानं अपहरण करून तिलाच संपवलं
उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील एका सनकी तरुणानं त्याची २४ वर्षीय प्रेयसीचं अपहरण करून तिची हत्या केली. ही घटना जानसठ परिसरातील कवाल गावची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी तैमून नावाच्या तरुमानं त्याची प्रेयसी तबस्सुमची हत्या केली. पोलिसांच्या मते तरुणी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करत आरोपी तैमूरला अटक केली.
पोलिस अधिकारी डी.के त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तबस्सुम तैमूरवर लग्नासाठी दबाव आणत होती. पण तो आधीच विवाहित होता. त्यामुळं दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. त्यामुळं सततच्या या वादाला कंटाळल्यामुळं तैमूर तबस्सुम पासून सुटका व्हावी असा विचार करत तिचं अपहरण केलं आणि तिची हत्या केली. त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी त्यांन तबस्सुमचा मृतदेह कालव्यामध्ये फेकून दिला होता.
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यानंतर त्यांना तैमूर बाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी तैमूरला ताब्यात घेतलं. चौकशीमध्ये पोलिसांना तैमूरकडून काही संकेत मिळाले. त्यामुळं त्यांनी तैमूरला खडसावून विचारणा केल्यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली देत पोलिसांना सर्वकाही सांगितलं. तबस्सुमचा मृतदेह कालव्यात फेकल्याची माहितीही त्यानं पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तबस्सुमचा मृतदेह शोधला आणि श्वविच्छेदन केलं.
0 Comments