दुःखद! मराठमोळ्या ऑक्सिजन संशोधक डॉ. भालचंद्र काकडे ऑक्सिजनअभावी निधन


 कोल्हापूर/प्रतिनिधी:

ऑक्सिजनचा उपयोग विविध क्षेत्रात कसा करता येईल याबाबत संशोधन करत असलेल्या मराठमोळ्या तरुण संशोधकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. कोल्हापूरच्या डॉ. भालचंद्र काकडे (वय ४४)यांचं चेन्नईत निधन झालं. त्यांच्या निधनामुळे प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.

भालचंद्र काकडे कोरोनामुळे बिघडल्याने त्यांना चेन्नई इथल्या एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवस त्यांच्यावर तिथे उपचार सुरु होते. त्यांची प्रकृतीही सुधारली होती. व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मंगळवारी रात्री उशिरा अचानक त्या रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा संपला. यामुळे तिथे उपचार घेत असलेल्या दहा जणांचा तडफडून मृत्यू झाला. त्यामध्ये डॉ. काकडे यांचाही समावेश होता.

डॉ. भालचंद्र काकडे यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात रसायनशास्त्र विषयात पदवी घेतली होती. जपानच्या टोकियो इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये देखील ते काही काळ कार्यरत होते. चेन्नईच्या एसआरएम संशोधन संस्थेमध्ये ते वरीष्ठ संशोधक म्हणून रुजू होते. आपल्या संशोधनाच्या जोरावर त्यांनी ७ पेटंट आपल्या नावावर केले आहेत.

Post a Comment

0 Comments