बार्शी! आधीच लॉकडाऊनचे संकट; बंद असलेल्या चहा कॅन्टीनला आग २५ हजारांचे नुकसान


बार्शी/प्रतिनिधी: 

आधीच कोरोनाच्या महा मारीत प्रत्येक जण जेरीस आला आहे. दि.१५ रोजी संध्याकाळी ८ च्या सुमारास शहरातील कोठारी पेट्रोल पंपा शेजारील सतीश बलभीम बरीदे यांच्या मालकीचे बालाजी टी हाऊस हे दुकान अचानक लागलेल्या आगीत खाक झाले.

लॉकडाऊन मुळे १ महिना झाले दुकान बंद होते. अचानक दुकानातून आग दिसुन आल्याने शेजारील नागरिकांना लक्षात आले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला व बरीदे यांना कळविले. अग्निशामकच्या बंबाने आग विझविण्यात आली. यामुळे मोठी हानी टळली. शेजारीच पेट्रोल पंप असल्याने नागरिकांची धावपळ झाली.

या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही, तरी सुमारे २५०००/- चे हॉटेल साहित्य जळून नुकसान झाले. अशी माहिती बरीदे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments