"चांगली दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरूस्त करा"पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याचं चित्र दिसत आहे. या निकालावरून अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला. ‘डन अँड डस्टेड! प्रिय सर्वोच्च नेते, द्वेष आणि विषाणू पसरवणं थांबवा. नागरिकांना स्पष्टपणे म्हटलं आहे. चांगली दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरूस्त करायला लागा’, असं प्रकाश राज यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

 निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल असं चित्र आहे. या निकालावरून प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. डन अँड डस्टेड! प्रिय सर्वोच्च नेते, द्वेष आणि विषाणू पसरवणं थांबवा. नागरिकांना स्पष्टपणे म्हटलं आहे. चांगली दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरूस्त करायला लागा, असं प्रकाश राज यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. पश्चिम बंगालमधील विजयासाठी भाजपनं जोर लावला होता.

भाजपच्या जागा जरी वाढताना दिसत असल्या तरी तृणमूल काँग्रेसची सत्ता कायम राहणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. ममता बॅनर्जी निवडणुकीला उभ्या असलेल्या जागेवर अनेकांचं लक्ष आहे. या ठिकाणी ममता बॅनर्जी विजयी होणार का की सुवेंदु अधिकारी ममता बॅनर्जींचा पराभव करणार हे पाहावं लागणार आहे. 

Post a Comment

0 Comments