"आमदार आवताडेंकडून ‘त्या’ कार्यकर्त्याच्या पायात चप्पल घालून केला सन्मान" ; सत्कारावेळी अश्रू दाटून आले

मंगळवेढा/प्रतिनिधी:

मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील दत्ता साबणे या कार्यकर्त्याने चप्पल घालणे थांबवले होते. जोपर्यंत समाधान आवताडे हे आमदार होत नाहीत; तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा दत्ता साबणे यांनी घेतली होती. आपल्यासाठी नवस बोलणाऱ्या कार्यकर्त्याचा नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांनी थेट त्याच्या घरी जाऊन त्याच्या पायात चप्पल घालून त्याचा पेहराव देऊन सत्कार केला. सत्काराप्रसंगी आमदार आवताडेंच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर समाधान आवताडे हे निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने चाचपणी करत होते.त्या वेळी नंदेश्वर येथील त्यांचे समर्थक कार्यकर्ते दत्तात्रेय साबणे यांनी ‘जोपर्यंत समाधान आवताडे आमदार म्हणून विजयी होत नाहीत, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही’ अशी प्रतिज्ञा केली.

यावेळी संत दामाजी ट्रस्ट समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, जिल्हा फेडरेशनचे सरोजभाई काझी, माजी जि.प.सदस्य नामदेव जानकर, माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक चौंडे,भारत गरंडे, आकाश डांगे, रुक्मिणीताई दोलतोडे, बापू गरंडे, पिंटू बंडगर, तुकाराम मोटे,बबलू सुतार व इतर ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments