बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी नगरपरिषदेच्या जवाहर हॉस्पिटलच्या प्रियदर्शनी इमारतीत सुविधा आय.सी.यू. ॲंड कॅथलॅब सेंटरच्या सहकार्यातून बार्शी कोवीड हेल्थ केअर सेंटर (DCHC) चे उद्घाटन आमदार राजेंद्र राऊत व प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी धन्वंतरी पूजन व दीपप्रज्वलनही करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष ॲड.आसिफभाई तांबोळी, तहसीलदार सुनील शेरखाने, डॉ.प्रकाश बुरगुटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे, बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे मालक, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, गटनेते दिपक राऊत, नगरसेवक कय्युम पटेल, संतोष भैय्या बारंगुळे, विजय चव्हाण, ॲड. महेश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
या कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णांकरीता ३० ऑक्सिजनचे बेड, १ ऑक्सिजन व्हेंटीलेटर बेड व २० प्राथमिक उपचाराच्या बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश बुरगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कैवल्य गायकवाड, डॉ. अजित आव्हाड, सर्जन डॉ. वैभव मोराळे हे सेवा देणार आहेत. त्यांच्यासोबत याठिकाणी ९ नर्स, ४ वाॅर्डबॉय व ६ स्वच्छता कर्मचारी मदतीला असणार आहेत.
0 Comments