आमदार समाधान आवताडे यांच्याकडून मतदारसंघातील कोरोना परिस्थितीचा आढावापंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे समाधान आवताडे ३७३३ मतांनी विजयी झाले त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी हारतुरे, गुलाल न स्वीकारता थेट अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जनतेच्या प्रश्नाला प्राधान्य देत त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबत आमदार प्रशांत परिचारक यांनीही मतदारसंघातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

आ. आवताडे यांच्या कडून मतदारसंघातील आरोग्य सेवेचा आढावा 

गेल्या दोन महिन्यापासून पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे रणधुमाळी चालू होती. दोन मे रोजी भाजपचे समाधान आवताडे यांच्या रूपाने मतदार संघाला नवीन आमदार मिळाला आहे. १७ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात कोरोना विषाणूची परिस्थिती बिकट झाली आहे. रोज चारशेच्या आसपास कोरोना रुग्णही दोन्ही तालुक्यात आढळताना दिसत आहेत. पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात  रुग्णांना बेड आणि ऑक्सिजनची कमतरता आहे. अशा गंभीर परिस्थितीचे भान राखत नुतन आमदार समाधान आवताडे व आ. परिचारक यांनी  तातडीने पंढपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या दालनात अधिकार्यांची बैठक घेतली. बैठक घेऊन आरोग्य सेवेचा आढावा घेतला. 

आमदार अवताडे हे ॲक्शन मोडमध्ये...

दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे २६ नोव्हेंबर रोजी कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर सहा महिने पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या मतदार संघ आला लोकप्रतिनिधी नव्हता निवडणूक आयोगाकडून १७  मार्च रोजी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली. त्यात राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत समाधान आवताडे यांनी भगीरथ भालके यांचा पराभव केला. मात्र विजय झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी आमदार समाधान आवताडे हे ॲक्शन मोड मध्ये असल्याचे दिसून आले. त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेत कोरोना संदर्भातील परिस्थिती जाणून घेतली आहे. त्यांच्यासोबत आ. आ.प्रशांत परिचारक यांनी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

Post a Comment

0 Comments