चिंताजनक! "फ्रि फायर गेम''प्रमाणे टास्क प्रमाणे मित्राची मान मोडून हत्या; टास्क प्रमाणे मृतदेह खड्यात गाडला


मध्यप्रदेश: 

धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील रतलाममध्ये घडलेली आहे. गेम खेळण्याचा बहाणा करत मित्रांनी एका अल्पवयीन मुलाचा खून केल्याचं समोर आलं आहे.
विशाल सिंह असं मृत मुलालं नाव असून त्याचं वय १५ वर्षे आहे. आरोपी उल्फत सिंग (वय-१८) आणि आणखी एक १६ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. या तिघा मित्रांना मोबाईल खेळण्याची सवय होती. विशालने आरोपींबद्दल त्यांच्या घरात तबांखू, सिगारेटचं व्यसन आणि मुलीची संबंध असल्याचं सांगितले होता. त्याचा राग मनात ठेवून उल्फतने त्याचा काटा काढायचा ठरवला होता.

आपल्या गाडीवरून विशालला गावाबाहेर आणलं आणि मोबाईलमध्ये एखादा टास्क देतात, तसा अगोदरच खड्डा खनून ठेवला होता. टास्कप्रमाणे आरोपींनी विशालची मान फिरवली. त्यात त्याच्या मानेचं हाड मोडलं आणि मृत्यू झाला. मृत झाल्यानंतर त्याचा मृतदेह खड्ड्यात गाडला.

विशालच्या वडिलांनी पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी गावातील लोकांची चौकशी केली असता, गावकऱ्यांनी उल्फातच्या गाडीवरून गावाबाहेर तिघे जण गेल्याचे समजले. पोलिसांनी उल्फत आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवला. त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर कोर्टात दोघांनी शिक्षा झाली. एकाला तुरुंगात तर, दुसऱ्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले.

Post a Comment

0 Comments