मंगळवेढा/प्रतिनिधी :
येथील पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असणार्या दोन पोलिस कर्मचार्यांना धुळदेव जगन्नाथ अनुसे (रा.धर्मगाव रस्ता,मंगळवेढा) याने कुर्हाडीचा धाक दाखवत दांडयाने ठोसा मारून तुम्ही पोलिस ठाण्यात कसे काम करता बघतोच, असे म्हणत खिडक्याच्या काचा, वॉटर कुलर व टिव्ही आदी साहित्यांची नासधूस करून ७५ हजाराचे नुकसान करत सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, आरोपी धुळदेव अनुसे हा दि १२ मे रोजी ९.१५ वाजता मंगळवेढा पोलिस ठाण्यात येवून कर्तव्यावर असणारे फिर्यादी पोलिस नाईक बापूराव पवार व पोलिस शिपाई तांबोळी यांना कुर्हाडीचा धाक दाखवून धक्काबुक्की करून कुर्हाडीच्या दांडयाने ठोसा मारत तसेच तुम्ही पोलिस ठाण्यात कसे काम करता बघतोच असे म्हणून सरकारी कामात अडथळा आणला, आणि हातातील कुर्हाडीने पोलिस ठाण्याच्या खिडक्यांच्या काचा, वॉटर कुलर, टि.व्ही, अधिकारी व कर्मचारी यांची नावे असलेला बोर्ड फोडून ७५ हजार रुपयांचे नुकसान केल्याचे पोलिस नाईक बापूराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल बामणे हे करीत आहेत.
0 Comments