पंढरपूर/प्रतिनिधी:
पंढरपूर येथील सुपुत्र व मुंबई उच्च न्यायालयात वकिलीचा व्यवसाय करणारी एडवोकेट सारंग सतीश आराध्ये यांनी कोरोना पार्श्वभूमीवर मातृभूमी असलेली नाळ जपत मागील वर्षी पंढरपुरातील रुग्णांसाठी हाय फ्लो नॅशनल ऑक्सिजन मशीन व पंढरपूर तालुक्यात ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून दिली आहे. या सर्व वैद्यकीय यंत्रणांची किंमत तीन लाख ८७ हजार रुपये इतके आहे.
पंढरपूरकरांच्या मदतीसाठी हात देणारे सुपुत्र
पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील कोरोना रुग्णसंख्या धोकादायक अवस्थेत आहेत. त्यामुळे राज्यातून विविध पद्धतीने पंढरपूर करण्यासाठी मदत येत आहे. पंढरपूर येथील असणाऱ्या पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक धीरज गाडी यांनी अशाच पद्धतीने पाचशे कुटुंबियाना धान्याचे वाटप करून मदतीचा हात दिला होता. त्याचप्रमाणे मुंबईतील उच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या सारंग आराध्या यांनीही पंढरपूर येथील रुग्णांसाठी हाय फ्लो नेसल ऑक्सिजन मशिन उपलब्ध करून दिले होते. कोरोना वाढती संख्या आणि ऑक्सिजनचा लक्षात घेऊन त्यांनी आता पुन्हा सुमारे ८० हजार रुपये खर्च करून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन दिले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांचे जीवन वाचण्यास मदत
मुंबई उच्च न्यायालयात उत्तम वकिलीचा व्यवसाय करणाऱ्या सारंग सतीश आराध्ये यांनी पंढरपूर येथील त्यांचे मित्र प्रसिद्ध डॉ. प्रविण दत्त वांगीकर यांच्या मदतीने कोरोना काळात लागणाऱ्या हाय फ्लो नेसल ऑक्सिजन मशिन उपलब्ध करून दिली तर अमेरिकेतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन मागवण्यात आली आहे. वैद्यकीय यंत्रणा प्रवीण दत्त वांगीकर यांच्याकडे सारंग आराध्ये यांनी सुपूर्त करून दिल्या आहेत या सर्वांची किंमत जवळपास चार लाखांच्या घरात आहे या मशीनद्वारे अनेक रुग्णांना मदत होणार आहे. रुग्णांना वापरासाठी देणे सुरू करण्यात आले आहे. नाममात्र सेवाशुल्क घेऊन गरजू रुग्णांच्या घरी हे मशिन उपलब्ध करून देण्यात येत असून. हे मशिन रुग्णांना जीवदान देण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.
0 Comments