भाजप नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. राज्यपालांनी १२ आमदारांच्या नियुक्त्या रखडवल्याच्या आरोपावर आशिष शेलार यांनी भाष्य केलं.
ओबीसीमध्ये मराठा समाज नको, अन्यथा गंभीर परिणाम!
कोरोनाच्या काळात १२ आमदारांचा विषय कुठून आला? कोरोनच्या पार्शवभूमीवर कोणत्याही निवडणुकीचं काम केलं तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार जबाबदार. आज कोरोनाच्या काळात आणि बालकांच्याही चिंतेच्या काळात यांना १२ आमदारांची आठवण कशी येते? स्वतःचं राजकारण सुरु आहे, अशी टीका शेलारांनी केली.
भुताचा डाव भारी पडेल
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून काय भाषा वापरली जात आहे? रोज १२ , १२ ची टिमकी काय लावली आहे? तुमचे १२ वाजले आहेत काय? अशी प्रश्नांची सरबत्ती शेलारांनी केली.
परवानाधारक रिक्षाचालकांनो 'या' लिंकवर करा अर्ज
भुताने जर फाईल पळवली असेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, भाजप (political party) तर काही करत नाही, पण भाजपने एक डाव भुताचा टाकला तर तुम्हाला भारी पडेल हे सुद्धा संजय राऊत यांनी लक्षात ठेवावे, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या पदाला शोभेणारे काम केले पाहिजे. आता त्यांनी विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या फाईलवर सही केली की आम्ही पेढे वाटू, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली. १२ आमदारांच्या नावाची फाईल भुताने पळवली नसून ती राजभवनातच आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता राज्यपालांनी त्यावर सही करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले.
0 Comments