धक्कादायक! ५० हजार रुपये घेऊन रेमडीसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार; चौघांवर बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल


बार्शी/प्रतिनिधी:

औषध निरीक्षक व अन्न व औषध प्रशासन सोलापूर ना.सी .भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महेश शामराव पवार राहणार राऊत चाल यांनी दिनांक ७ मे रोजी जवळच्या नातेवाईकांसाठी रेमडीसिवीर इंजेक्शन मिळवण्याच्या प्रयत्नात असता, मित्राकडून निखिल राजकुमार सगरे हा रेमडीसिवीर इंजेक्शनचे ब्लॅक ने विकत आहे असे समजल्याने त्यांनी मित्रा कडून त्यांचा फोन नंबर मिळवून फोन केला असता, पन्नास हजार रुपयात दोन इंजेक्शन मित्राकडून आणून देतो. माझ्या अकाउंट ला पैसे पाठवा असे सांगितले, निखिल यांना पैसे पाठवल्यावर कॅन्सर हॉस्पिटलच्या जवळ रात्री साडेआठ वाजता दोन इंजेक्शन आणून दिल्यावर महेश यांनी इंजेक्शन वरील टोल फ्री फोनवर फोन केला असता अवैध सांगण्यात आल्यानंतर त्यांचा संशय बळावल्याने सदरचे इंजेक्शन डुप्लीकेट आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यावर इंजेक्शन परत घेण्यासाठी निखिल ला सांगितले असता, सुरुवातीला इंजेक्शन परत घेत नाही, असे सांगत दिनांक ०८/०५/२०२१ रोजी साडेदहा वाजता च्या सुमारास बार्शी येथील कॅन्सर हॉस्पिटल च्या आसपास बोलावले, असता निखिल सगरे तेथे आले व सांगितले की सदरची इंजेक्शन मी अमित वायचळ यांच्याकडून आणले. 

अमित वायचळ ला फोन लावला असता त्या लोकांना माझ्या समोर आणू नको निखिल एकटाच येतो असे सांगून अभिजीत लंचेच्या मागे त्यांनी त्याला बोलावले असता त्यांनी थोडे पैसे देऊन बाकीचे पैसे मागत असता बाकीचे पैसे देत हे इंजेक्शन विकास उर्फ बाप्पा जाधवर व भैया इंगळे यांच्याकडून आणले आहेत, अशाप्रकारे नकली इंजेक्शन विकणाऱ्या चौघांचा पर्दाफाश करत बार्शी शहर पोलीस स्टेशन मध्ये १)अमित सुभाष वायचळ रा. जावळी रोड बार्शी, २) निखिल राजकुमार सगरे रा. बळेवाडी ता. बार्शी ,३) विकास उर्फ बाप्पा काशिनाथ जाधवर रा. जावळी प्लॉट बार्शी,४) भैया इंगळे रा. येडशी यांनी संगनमत करून शासनाने निर्धारित केलेल्या रेमडीसिवीर
 इंजेक्शन च्या दरापेक्षा जास्त दराने गैरमार्गाने डॉक्टरच्या कोणत्याही चिठ्ठीशिवाय विनापरवाना विना भिलाने इंजेक्शनच्या औषधाचा ५० हजार रुपये विक्री केली म्हणून बार्शी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी अमित सुभाष वायचळ हा पोलिसांच्या हाती लागला असून बाकी आरोपी फरार आहेत बार्शी पोलिस स्टेशनचे पोलीस अधिक तपास करत आहे.

Post a Comment

0 Comments