काही दिवसांपुर्वी अभिनेत्री म्हणजे कंगना रणावतचा बॉडीगार्ड कुमार हेगडे विरोधात डी. एन. नगर पोलीस स्थानकात एका ३० वर्षीय ब्युटिशियनने गुन्हा दाखल केला होता. कुमार हेगडेला नुकतीच कर्नाटमधून अटक करण्यात आली आहे. कुमारवर लग्नाचे आमिष दाखवून फसणूक केल्याचा आणि बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. कुमारला त्याच्या गावामधून अटक करण्यात आली आहे.
पीटीआयला मुलाखत देताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले,’मुंबई पोलिसांच्या एका टीमनं शनिवारी कुमार हेगडेला कर्नाटकमधून अटक केली आहे. कुमारने पीडित महिलेशी संपर्क साधणे बंद केले होते. त्यामुळे त्या महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. त्याने महिलेकडून पाच लाख रूपये घेतले. मात्र ते परत केले नाही असे तिने सांगितले आहे.’
पीडित महिलेने कुमारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये पीडित महिला एका चित्रपटाच्या शुटिंगवेळी कुमारला भेटली होती. त्यानंतर त्याने तिला लग्नासाठी विचारले होते. नंतर कुमारने महिलेला लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहण्यास सांगितले होते. तो तिच्याशी लग्न करणार असल्याने ती लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहण्यास तयार झाली. एकत्र राहताना कुमारला त्या महिलेने शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला. पण काही दिवसांनी त्याने तिला ते करण्यास भाग पाडले. आईची प्रकृती खराब झाल्याचे कारण सांगून कुमारने त्या महिलेकडून ५ लाख रूपये घेतले आणि तेव्हा पासून त्याने तिच्यासोबत संपर्क बंद केला.
याआधी देखील कंगनाच्या हेअर स्टाइलिस्ट ब्रेंडन एलीस्टर डी जीवर २०२० मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
0 Comments