बार्शी! उक्कडगाव येथे विवाहितेची सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या; सासू व नवऱ्याला पांगरी पोलिसांनी केली अटक


पांगरी/प्रतिनिधी:

सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार बार्शी तालुक्यातील उक्कडगाव मध्ये उघडकीस आला आहे. खंडू येडबा बिकड वय ३८ रा. नाहोली ता. केज जिल्हा बीड यांचा दिनांक १४/०५ रोजीच्या फिर्यादीनुसार यांच्या सुनील भास्कर बिकड नाव असलेल्या चुलत भाऊ व्यवसाय मजुरी यांची मोठी कन्या मयत पल्लवी वय २१असलेल्या मुलीचे लग्न दिनांक ०२/०५/२०१९ रोजी उक्कडगाव तालुका बार्शी परिक्षित सुमंत मुंढे यांच्याबरोबर रितीरिवाजाप्रमाणे झाले होते. 

परंतु खव्याच्या व्यवसायाकरता माहेर करून एक लाख रुपये आणण्यासाठी मयत पल्लवीला तिचा नवरा व सासू मारहाण, उपाशी ठेवणे, शिवीगाळ करणे यामुळे सततच्या होणाऱ्यात्रासाला कंटाळून पल्लवी परीक्षेत मुंडे यांनी राहत्या घरात दिनांक १३/०५/२०२१ रोजी सायं.५ च्या सुमारास सासरच्या जाचास कंटाळून पल्लवी ने सिलिंग फॅनला दोरीने गळफास घेऊनआपली जीवनयात्रा संपवली.

त्यामुळे सासू छाया सुमंत मुंडे नवरा परीक्षेत सुमंत मुंडे यांच्यावर पांगरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला असून त्यांना अटक करून पुढील तपास पांगरी पोलिस स्टेशनचे प्रभारी सुधीर तोरडमल हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments