...अन् प्रियकराला सोडून नवऱ्याकडे परतली प्रेमिका; प्रियकराने केले धक्कादायक कृत्य


एका महिलेची तिच्याच शेजारी राहणाऱ्या एका युवकाशी झाली. ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. पण या महिलेचे लग्न झाले होते. महिलेला दोन मुली सुद्धा आहेत. कशाचा विचार न करता पतीची आणि मुलींची काळजी न करता आपले कुटुंब सोडले आणि आपल्या प्रियकराबरोबर राहायला गेली. थोड्याच दिवसांत महिलेचे तिच्या प्रियकराबरोबर रोज भांडणे सुरू झाली. दररोजच्या भांडणाला वैतागून तिने प्रियकराची साथ सोडली. या महिलेने आपल्या पतीची माफी मागितली आणि पती आणि मुलांसमवेत राहू लागली.

डोंबिवली पूर्वेमध्ये राहणाऱ्या या प्रियकराला त्याचे सोडून जाणे सहन होत नव्हते तेव्हा एक दिवस प्रियकर तिच्या घरी पोहोचला आणि त्याच्याबरोबर चालण्याचा आग्रह धरला. मैत्रीण तिच्या नवऱ्याला सोडण्यास तयार नव्हती. यामुळे संतप्त झाला. तो त्या महिलेला धडा शिकवण्याचा विचार करू लागला. त्याने महिलेच्या मुलीचे अपहरण करण्याचा कट रचला.  सर्वत्र शोध घेतल्यानंतरही महिलेला आपली मुलगी सापडली नाही तेव्हा महिलेने तिच्या प्रियकरावर संशय घेतला. तिने पतीसह मानपाडा पोलिस ठाण्यात जाऊन तिचा प्रियकर दिनेश तिवारी याच्याविरूद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला. सुमारे सहा तासांच्या प्रयत्नांनंतर पोलिस अधिकारी श्री कृष्णा गोरे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी आरोपीला शोधून काढले आणि त्याला पकडले. पोलिसांनी आरोपीकडून महिलेच्या तीन वर्षाच्या मुलीलाही ताब्यात घेऊन महिलेच्या स्वाधीन केले.


Post a Comment

0 Comments