मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पराभूत करणाऱ्या सुवेंदू अधिकारीला भाजपने "हि" दिली मोठी जबाबदारी



 ममता बॅनर्जी यांचा पराभव करणार्‍या सुवेंदू अधिकारी यांना भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे. सुवेंदू यांची राजकीय भूमिका भारतीय जनता पक्षासाठी चांगली ठरली आहे. त्यामुळे भाजपने त्यांना विरोधी पक्ष नेत्याची मोठी जबाबदारी दिली आहे.

सुवेंदू अधिकारी विधानसभेत विरोधी पक्षनेते 
भारतीय जनता पक्षाने सुवेंदू अधिकारी यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी सुवेंदू अधिकारी यांच्या व्यतिरिक्त बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष आणि मुकुल रॉय यांच्या नावांचीही चर्चा होती. मात्र, सुवेंदू  यांना संधी देत पक्षाने मोठी जबाबदारी दिली. 

सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा केला पराभव  
सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या निवडणूक लढाईत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सुवेंदूअधिकारी यांनी नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांना १९५६ मतांनी पराभूत केले. भाजपने या निवडणुकीत ७३ जागांवर विजय मिळवला आहे.

Post a Comment

0 Comments