महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणाबद्दल गिरीष कुबेर यांचा निषेध - नारायण राणे



मुंबई/प्रतिनिधी : “पत्रकार गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद व आक्षेपार्ह लेखन केले आहे. या लेखनाबद्दल गिरीष कुबेर यांचा मी जाहीर निषेध करतो. असे ट्विट भाजपचे खासदार नारायण राणे यांना केले आहे.

‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ हे पुस्तक पत्रकार गिरीश कुबेर यांनी लिहिले असून या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद व आक्षेपार्ह लेखन केले असल्याचा आरोप सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे.

यामुळे, रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावरती बंदी घालण्याची मागणी संभाजी ब्रिगेड संघटनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली आहे. तसेच या लेखनामुळे मराठा समाजही दुखावला गेला आहे. असे म्हणत भाजपचे खासदार नारायण राणे यांनी गिरीश कुबेर यांचा निषेध करत एक ट्विट केले आहे.

Post a Comment

0 Comments