शिवभक्ताने शिवाजी महाराजांचा पुतळा; लाखो रूपये खर्च घरांवर बसवला....


कर्नाटक :

कर्नाटक मधील शिवप्रेमी नागेशस्वामी दिवटे यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून आपल्या निवासस्थानी ५० फूट उंचावर बारा फूट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली आहे.नागेशस्वामी दिवटे यांनी दोन लाख रुपये खर्च करून या पुतळ्याची उभारणी केली आहे.  बसवण कुडची येथील नागेशस्वामी दिवटे यांनी असे काही न करता आपल्या घरावर छ शिवाजी महाराजांचा पुतळा ऊभारून आदर्श निर्माण केला आहे.
 
आमदार अनिल बेनके आणि युवा समितीचे शुभम शेळके यांच्या उपस्थितीत पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.सदर अश्वारूढ पुतळा बेळगाव येथील प्रसिध्द मूर्तिकार संजय किलेकर यांनी तयार केला आहे.

नागेशस्वामी दिवटे यांना बालपणापासून शिवाजी महाराजांचे आकर्षण आहे.शिवाजी महाराजांचा इतिहास तरुण पिढीला समजावा आणि तरुण पिढीने त्याचा अंगीकार करावा म्हणून दिवटे नेहमी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतात.आपल्या गावात उंचावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला तर सदैव महाराजांची स्मृती जागृत राहील.दररोज शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घडल्याने तरुण पिढीला प्रेरणा मिळेल या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना पन्नास फूट उंचीवर आपल्या इमारतीवर करून वेगळा आदर्श निर्माण केला. लोकवार्ता माध्यम समूहाकडून असा शिवभक्तांला मानाचा मुजरा. 

Post a Comment

0 Comments