आरोग्य विभागात १६ हजार पदे तातडीने भरली जाणार; आरोग्यमंत्र्यांची घोषणा


राज्यात आरोग्य विभागात तब्बल १६००० पदे भरण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली

आरोग्य विभागातील १६ हजार पदे तातडीने भरली जाणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. या १६ हजार पदांमध्ये क आणि ड वर्गातील १२ हजार कर्मचार्‍यांची भरती केली जाणार आहे. तर अ आणि ब वर्गातील प्रत्येकी २ हजार अशी ४ हजार पदे भरली जाणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं आहे. ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीने आदेश जारी करणार असल्याचंही टोपे म्हणाले.

कोरोनाची तिसरी लाट जुलै-ऑगस्ट महिन्यात येण्याची शक्यता आहे. त्याची पूर्वतयारी राज्यशासनाकडून केली जात आहे. प्रत्येक जिल्ह्याला त्याबाबत स्पष्ट सूचना दिलेली आहे. बेड, ऑक्सिजन तसंच मनुष्यबळाच्या बाततीत आपण सज्ज असलं पाहिजे, असे आदेश आरोग्य मंत्री या नात्याने मी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. असे टोपे म्हणाले.

Post a Comment

0 Comments