करमाळा नगरपालिकेची धडाकेबाज कारवाई, लॉकडाऊनमध्ये गुपचुप व्यवसाय करणारांचे धाबे दणाणले


 
करमाळा/प्रतिनिधी:
            
करमाळा नगरपालिकेने करमाळा शहरात धडाकेबाज कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्या व्यायसायिकांना त्यांच्या आस्थापना उघडण्यास राज्यसरकार तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी सक्त मनाई केली आहे. असे व्यावसायिक त्यांच्या आस्थापना गुपचुप उघडून व्यवसाय करत असल्याच्या पार्श्वभुमीवर व कोरोना पसरविण्याचे कृत्य करत असल्यामुळे, करमाळा नगरपालिका मुख्याधिकारी वीणा पवार यांना कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे. 

करमाळा-पुणे रोडवरील चॉईस फुटवेअर हि आस्थापना शासन आदेश डावलून, उघडी असल्याने व कोरोनासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होईल. असे कृत्य करत असल्याचे आढळून आल्यामुळे या आस्थापनेवर मुख्याधिकारी वीणा पवार यांनी बेधडक कारवाई करत, हि आस्थापना  शासकिय नियमानुसार  'सील' केली आहे. त्यामुळे गुपचुप कोरोनाला निमंत्रण देणारांचे धाबे दणाणले आहेत.

याप्रसंगी मुख्याधिकारी वीणा पवार बोलताना म्हणाल्या कि, कोरोनासारख्या महामारीला रोखण्यासाठी शासन त्याच्या स्तरावरुन पुर्णपणे प्रयत्न करत आहे. परंतु काही व्यापारी व नागरिक शासनाच्या या प्रयत्नात कुठे तरी बाधा आणत आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला अशा बेजबाबदार व्यक्तिंवर कारवाई करणे भाग पडत आहे. तरी करमाळा शहरातील सुजान नागरिकांनी, शासन नियमानुसार ज्या आस्थापना बंद ठेवण्याचा आदेश आहे. त्या आस्थापना गुपचुप उघडल्या जातात. अशा आस्थापना उघडल्यास त्याविषयी माहिती द्यावी, माहिती देणाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. अशा प्रकारचे करमाळा नगरपालिकेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments