'गोकुळ’च्या अध्यक्षपदासाठी यांची नावे आघाडीवर; निवडीवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष


कोल्हापूर/प्रतिनिधी  : 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाचे अध्यक्ष निवड शुक्रवारी (दि. १४ मे) होणार आहे. अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अरुण डोंगळे, नाविद मुश्रीफ यांची नावे चर्चेत आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून करवीर तालुका प्रांताधिकारी वैभव नावडकर काम पाहतील.

अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्व नवोदित संचालकांना निवडीच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. गोकुळ दूध संघासाठी चुरशीने झालेल्या निवडणुकीनंतर आणि धक्कादायक निकालानंतर आता अध्यक्षपदाच्या निवडीकडे जिल्ह्याचेच नव्हे; तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अरुण डोंगळे या दोघांची नावे अध्यक्षपदाच्या चर्चेत आहेत.

Post a Comment

0 Comments