मदुरा मायक्रोफायनान्स च्या वतीने बार्शी पोलीस स्टेशनला सॅनिटायझर व मास्क भेट...



बार्शी/प्रतिनिधी :

आर्थिक आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या आणि सामाजिक उपाक्रमात नेहमीच सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मदुरा मायक्रोफायनान्सच्या बार्शी शाखेच्या वतीने, सी एस आर फंडातून, कोरोना महामारीच्या काळात पोलिस बांधवांच्या सुरक्षिततेसाठी बार्शी शहर पोलीस स्टेशनला अनोखी भेट देऊन समाजहित जोपासण्याचे कार्य केले आहे. 

याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, निर्भया पथकाचे विकास माने, ठाणे अंमलदार महेश मुंढे, श्री. नागरगोजे, महिला हेडकॉन्सटेबल देशमुख मॅडम व इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत, ७० सॅनिटायझर बॉटल आणि ७० मास्क भेट देऊन पोलिस बांधवांच्या कार्याबद्दल गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करत अभिनंदन करण्यात आले. यावेळी मदुरा मायक्रोफायनान्सचे बार्शी शाखेचे शाखाधिकारी सुरेश पवार, कॅशियर इजहार शेख, गणेश कदम, योगेश निवरगे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments