करमाळा/प्रतिनिधी:
करमाळा शहरात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रुग्णालय करमाळा या ठिकाणी लसीकरण घेण्यात येत आहे. तरी या लसीकरणासाठी करमाळा नगर परिषदेतर्फे टोकन वाटप करण्यात येत असून, हे टोकन घेण्यासाठी करमाळा शहरातील वयोवृद्ध नागरिक पहाटेपासून रांगेमध्ये उभा राहतात. व नगरपरिषदेमार्फत देण्यात येणारे टोकण रीतसर रांगेत उभा राहून घेत आहेत.
व त्याचप्रमाणे करमाळा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी रांगेत उभे राहून व नोंदणी करून रीतसर लस घेत आहेत. परंतु वशिलेबाजी व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या संबंधित लोकांना टोकण न देता, नोंद न करता, लस देण्याचा प्रकार चालू आहे. तरी रीतसर लोकांना दिली जाणारी लस कमी प्रमाणात भरून दिली जात आहे. व नोंदणी न करता वशिलेबाजी करुन संबंधीत लोकांना मागील दाराने लस दिली जात आहे.
तसेच वयोवृद्ध व आम जनता रांगेत थांबुन, नोंदणी करून रीतसर लस घेत आहे. तरी आम जनतेला लसीचे प्रमाण कमी देऊन त्यांच्यावर अन्याय होत असून, प्रशासनाने या गोष्टीवर लक्ष द्यावे. व करमाळा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी असणारे लसीकरणाचे सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करण्यात यावे. व उपजिल्हा रुग्णालयाचा गैरकारभार निर्दशनास आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करमाळा तहसीलदार यांच्याकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करमाळा शहर उपाध्यक्ष आझाद भाई शेख यांच्या वतीने करण्यात आली आहे.
0 Comments